भुसावळातील ड्रग्ज प्रकरण : मुंबईतील आरोपीची कोठडीत रवानगी


Bhusawla drug case : Accused sent to custody in Mumbai भुसावळ : भुसावळातील ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्रिकूटाकडील 72 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 910 ग्रॅम मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ जप्त केला होता. संशयितांच्या चौकशीनंतर मुंबई येथून हे ड्रग्ज आणल्याचे स्पष्ट होताच संशयित मृदुल चंपकलाल वैद्य (31, भुलेश्वर, चर्नी रोड, मुंबई) यास अटक करण्यात आली होती. संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राज्यभरात ड्रग्ज पेडलरांची साखळी
अटकेतील आरोपी दीपेश मालवीय याने मृदुल याच्याकडून ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीस चौकशीत मृदुलचे राज्यभरातील साथीदार कोण, ड्रग्जचे पुरवठादार कोण आदी बाबी समोर येण्याची शक्यता आहे शिवाय राज्यभरातील ड्रग्ज पेडलरांचे नेटवर्कही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी कुणाल भरत तिवारी (30, प्लॉट नंबर 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस (28, रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगाव रोड, भुसावळ), दीपेश मुकेश मालवीय (31, लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) या त्रिकूटाला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 72 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 910 ग्रॅम मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.



आज आरोपींना न्यायालयात हजर करणार
अटकेतील चारही आरोपींची मुदत शुक्रवारी संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक गजानन पघडन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !