भुसावळनंतर जळगावात मोठी कारवाई : दहा लाखांच्या ड्रग्जसह दोघा आरोपींना अटक

जळगाव शहर पोलिसांची कामगिरी : तरुणाई नशेच्या आहारी


Big action in Jalgaon after Bhusawal : Two accused arrested with drugs worth ten lakhs जळगाव : भुसावळ शहरात 73 लाखांचे नशा आणणारे मेथाक्वॉलोन ड्रग्ज जप्तीची घटना ताजी असतानाच जळगाव शहर पोलिसांनी ड्रग्जचा बाजार उधळत दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडील सुमारे दहा लाखांचे राज्यात प्रतिबंधीत एम.डी.ड्रग्ज जप्त केले आहे. याबाबतची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, 22 मार्च रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत दिली. ईम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती (रा.शाहू नगर, जळगाव) व गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (रा. 40, रा.कंजरवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील शाहू नगरात एम.डी.ड्रग्ज विक्रीसाठी संशयित येणार असल्याची माहिती जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरीष्ठांना कल्पना दिली व सापळा रचण्यात आला. इम्रान भिस्ती हा संशयित आल्यानंतर त्यास शुक्रवारी रात्री 12.30 वाजता ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील 122 ग्रॅम वजनाचे एम.डी. व दोन मोबाईल मिळून नऊ लाख 77 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताने चौकशीत हे एम.डी.ड्रग्ज जळगावातील गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (रा.40, रा.कंजरवाडा) याने दिल्याची माहिती दिल्यानंतर त्यासदेखील मध्यरात्री अटक करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगा शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, हवालदार भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गीते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !