पारोळानजीक टोल नाक्याची जाळपोळ : धुळ्यातील संशयीताला अटक


Arson of toll booth near Parol: Suspect arrested in Dhule पारोळा : पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील असलेल्या टोल प्लाझाची जाळपोळ केल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आधारे पारोळा पोलिसांनी धुळे शहरातून संशयिताला अटक केली आहे.

उद्घाटनाच्या दिवशी केली होती जाळपोळ
पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील असलेल्या टोल प्लाझाचे उद्घाटन होणार त्याची दिवशी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. आगीत टोल प्लाझाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तोडफोड व जाळपोळची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. त्या अनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी चक्र फिरविले. पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, अमरसिंग वसावे, सहायक फौजदार सुनील पवार, सुनिल हटकर, महेश पाटील यांचे पथक सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीद्वारे सोनू उर्फ प्रितेश ईश्वर गुजर (27) या धुळे येथील गल्ली नंबर सहा येथील आपल्या घरातून अटक करण्यात आली. पोलीस आता संशयिताच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.


कॉपी करू नका.