वराडसीम येथे प्रयोगशाळेतून सात हजारांचे साहित्य लांबवले


At Varadsim, 7,000 worth of materials were delivered from the laboratory भुसावळ :  भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावातील गुण नियंत्रण प्रयोग शाळेतून चोरट्यांनी सहा हजार पाचशे रुपयांचे वजनमापे व इलेक्ट्रीक वजनकाटा लांबवल्याचा प्रकार 22 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुण नियंत्रण उपविभाग जळगावचे कनिष्ठ अभियंता प्रवीण वासुदेव भिरूड (निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, वराडसीम येथील गुण नियंत्रण प्रयोगशाळेच्या खिडक्यांचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश करीत शाळेतील वजनमापे तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आदी सहा हजार 550 रुपयांचे साहित्य लांबवले. 22 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 दरम्यान ही चोरी झाली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !