पाल परिमंडळात दुचाकीवरून डिंकाची चोरटी वाहतूक रोखली : आरोपी पसार


The smuggling of gum on two-wheelers was stopped in Pal circle : accused Pasar पाल, ता.रावेर : रावेर वनक्षेत्रातील पाल परिमंडळ वन कर्मचार्‍यांनी दुचाकीवरून डिंकाची होणारी चोरटी वाहतूक रोखत तीन हजार 850 रुपयांचा 35 किंमतीचा सलाई डिंक जप्त केला मात्र संशयित आरोपी वाहन सोडून पसार झाले.

रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाल वनपाल डी.जी. रायसिंग, वनरक्षक एम.एम.तडवी, वनरक्षक सुपडू सपकाळे, कायम वनमजूर हे क.नं 57/58 मधून मांजल रस्ता भागात गस्त घालत असताना दुचाकीवरून संशयित काहीतरी वस्तू नेत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने त्यास हटकले असता संशयित दुचाकी व मुद्देमाल सोडून पसार झाल. यावेळी 54 हजारांच्या होंडा शाईन दुचाकीसह पिशव्यांमधील 35 किलो सलाई डिंक जप्त करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !