चिनावल प्राथमिक शाळेत चोरीचा प्रयत्न


सावदा : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची प्राथमिक शाळेत 21 रोजी रात्री चोरट्यांनी धूडगुस घालत चोरीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

चोरट्यानीं शाळेच्या कार्यालयासह अन्य दोन वर्ग खोल्यांचे कडी-कोयंडे तोडत महत्वाचे कागदपत्रे अस्ताव्यस्त करीत शाळेतून चोरीचा प्रयत्न केला. शाळा प्रशासनाकडून कागदपत्रे व साहित्याची जुळवा-जुळव झाल्यानंतरच नेमके काय चोरीला गेले? याचा अंदाज येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील अनेक बंद घरांकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत चोर्‍या केल्यानंतर चोरटे आता थेट शाळेत धडकले आहेत.



शुक्रवार, 22 रोजी सकाळी शाळेत आलेल्या शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर सावदा पोलिसांना शाळा प्रशासनाने व पोलीस पाटील यांनी माहिती दिली. सावदा पोलिसांनी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !