भुसावळ शहरानजीक भरधाव आयशर पलटली : शहरातील चालकाचा मृत्यू


Eicher Overturns Near Bhusawal City : City Driver Dies भुसावळ : अकोला येथून माल खाली करून भुसावळ येथे येत असलेली भरधाव आयशर (एम.एच.19 सी.वाय.9839) चालकाचा ताबा सुटल्याने उलटल्याने वाहन चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी 4.30 वाजता महामार्गावर साकरी येथील बंद टोलनाक्याजवळ घडला. सुनील जगन्नाथ पाटील (45, श्रीराम नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

जागीच झाला चालकाचा मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक निर्मल कोठारी व त्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन क्रेन आणि नागरिकांच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर चालक सुनील याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत सुनील यांचा मृतदेह येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल पाटील व त्यांचे सहकारी तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू सांगळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.



अपघात प्रकरणी येथील बाजार पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सुनील याच्या मृत्यूमुळे श्रीराम नगरात शोककळा पसरली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !