मुक्ताईनगरनजीक भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लीनर ठार


Rushing truck overturns near Muktainagar : Cleaner along with driver killed मुक्ताईनगर : सोडियम क्लोराईडची वाहतूक करणारा भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 24 रोजी रात्री घडला.

वाहनाखाली आल्याने दोघांचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तिरंगा, मलकापूर रोडवर रविवारी रात्री सोडियम क्लोराइडने भरलेला ट्रक क्रमांक (जी.जे.03 ए.झेड.6339) हा उलटल्यानंतर ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही ट्रक खाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना ट्रक खालून काढून लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू ओढवला. अपघातची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत क्लीनर व ड्रायव्हरला बाहेर काढण्यास मदत केली. अपघात प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !