धुळ्यातील 47 लाखांचे अपहार प्रकरण : भास्कर वाघसह दोघे दोषी


Dhula embezzlement case of 47 lakhs : Bhaskar Vagh along with two convicts धुळे  : धुळे जिल्हा परीषदेतील 47 लाखांच्या अपहार प्रकरणी भास्कर वाघसह सखाराम वसावे या दोघांना विविध कलमांन्वये विशेष न्यायाधीश एफ.ए. एम. ख्वॉजा यांनी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, 33 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात वाघ यास शिक्षा झाली असून तो 1994 पासून येरवडा कारागृहात आहे.

असे आहे अपहार प्रकरण
सुमारे 33 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे 47 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 26 जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता. 30 डिसेंबर 1988 ते 25 सप्टेंबर 1989 या कालावधीत अपहार झाला. एकूण 26 जणांविरुद्ध खटला दाखल झाला होता. पैकी 17 संशयित मृत झाले असून नऊ जण हयात आहेत. नऊपैकी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे यांना शिक्षा झाली आहे.

यांची सबळ पुराव्याअभावी सुटका
सबळ पुराव्यांअभावी जगन्नाथ पवार, अशोक पवार, गुलफाम शेख, रामदास रामजादे, कृष्णलाल शहा, शिवकुमार जोशी व रामचंद्र महाले यांची निर्दोष मुक्तता झाली, अशी माहिती विशेष सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली.

वाघ 1994 पासून तुरुंगातच..!
भास्कर वाघ याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. यापैकी दहा खटल्यांचा निकाल लागला आहे, तर उर्वरित खटले न्यायप्रविष्ठ आहेत. वाघ हे सन 1994 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असून, त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झालेली आहे. त्यांना 10 खटल्यांमध्ये एकत्रित 130 वर्षांची शिक्षा झाली आहे.


कॉपी करू नका.