वरणगावात पाणीपुरवठा विस्कळीत : सब स्टेशनवर भाजपाचा तीन तास ठिय्या

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

0

Water supply disrupted in Warangaon : BJP stayed at the sub station for three hours वरणगाव : वरणगाव शहरात 18 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ही समस्या मार्गी लागण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी लढा सुरू केला. कठोरा जॅकवेलजवळील गाळ क्रेनद्वारे काढावा, अशी मागणी केली शिवाय सबस्टेशनवर सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तीन तास ठिय्या मांडण्यात आला.

भाजपा पदाधिकार्‍यांचा तीन तास ठिय्या
कठोरा जॅकवेलवर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळ, शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे मिलिंद भैसे, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, शामराव धनगर, रमेश पालवे, अनिल वंजारी, नाना चौधरी, हितेश चौधरी, गजानन वंजारी, बळीरामदादा सोनवणे, हाजी फहीम शेख, फजल भाई, डॉ.सादीक शेख, साबीर कुरेशी, किरण धुंदे, डॉ.नाना चांदणे, इरफान पिंजारी, नामदेव सोनवणे, छोटू सेवातकर यांच्या उपस्थित तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सुरळीत वीजपुरवठ्याचे आदेश
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा व सध्या दोन महिने वीजपुरवठा खंडित करू नये तसेच कठोरा जॅकवेलचा वीजपुरवठा स्वतंत्र वरणगाव फिडरवरून करण्यात यावा तसेच कठोरा येथे स्वतंत्र एक्सप्रेस फिडर मंजूर करावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना व्हिडिओकॉल करून करण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलवरून कार्यकारी अभियंता विवेक स्वामी, वरणगाव अभियंता डी.बी.पाटील, कनिष्ठ अभियंता आतीष कुलकर्णी, वरणगाव पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार यांच्याशी कॉन्फरन्स वरून संवाद साधला व तातडीने वीज पोल उभे करा व वीजपुरवठा सुरळीत करण्यासह वरणगावकरांना पाणीपुरवठा नियमित करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले. यावेळी आमदार संजय सावकारे यांच्याशी सुद्धा संपर्क करून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वरणगाव सब स्टेशनवर मुक्ताई नगर येथे सुरू असलेल्या मीटिंगमधून अभियंता डी.बाय.पाटील, आतीश कुलकर्णी यांनी तातडीने पंधरा मिनिटात वरणगाव सबस्टेशनवरून ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.


कॉपी करू नका.