माजी कृषि मंत्री शरद पवार यांच्या जळगाव जिल्ह्यात 3 मे रोजी जाहीर सभा

0

Former Agriculture Minister Sharad Pawar’s public meeting in Jalgaon district on May 3 रावेर : महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सुप्रीमा शरद पवार हे शुक्रवार, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. यावेळी त्यांच्या तीन सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार हे पंधरा दिवसांत दुसर्‍यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.

जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार सभा
सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवार, 3 मे रोजी जिल्ह्यात शरद पवार यांच्या तीन सभा होतील. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते 11.30 ते 1 वाजेदरम्यान चोपडा येथे सभेला उपस्थित राहतील. दुपारी 3 ते 4.30 वाजेदरम्यान भुसावळ येथे सभा घेतील. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान मुक्ताईनगर शहरात सभा घेतील. ते या दिवशी रात्री जळगावात मुक्कामाला थांबणार आहेत.

उद्या माघार : अंतीम चित्र स्पष्ट होणार
जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत उद्या म्हणजेच सोमवार, 29 एप्रिल रोजी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे आता खर्‍या अर्थाने प्रचाराला जोर चढणार आहे. ारतीय जनता पक्ष, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासह, शिंदेसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक आता जिल्ह्यात येणार आहेत. भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जळगावात येवून गेले तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना उद्धवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आणखी काही मोठे नेते जिल्ह्यात प्रचारसभा घेणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे

जिल्ह्यातीलच प्रमुख नेत्यांवर मुख्य जबाबदारी
महाविकास आघाडी व महायुतीकडून प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील नेत्यांवरच प्रचाराचा भार राहणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्याही सभा जिल्ह्यात होणार आहेत. महाविकास आघाडीकडून डॉ. सतीश पाटील, उन्मेष पाटील, अरुणभाई गुजराथी व संजय सावंत यांच्याही सभा होणार आहेत.

 


कॉपी करू नका.