भुसावळात अमृत योजनेच्या जलकुंभावरून पडल्याने कासव्यातील मजुराचा मृत्यू


Tortoise laborer dies after falling from Amrit Yojana aqueduct in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील गडकरी नगरात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या जलकुंभावर काम करीत असलेला मजूर वसंत चावदस मोरे (50) यांचा जलकुंभावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजता घडली. दरम्यान, सुरक्षेचे कुठल्याही उपाययोजनांची अंमलबजावणी न करता सुरू असलेल्या कामामुळे संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

उंचावरून पडताच मृत्यू
शहरातील गडकरी नगरात अमृत योजनेच्या माध्यमातून जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी या जलकुंभावर वसंत मोरे हे काम करीत असतांना खाली पडले. यावेळी त्यांना सुरक्षेचे काहीही कवच नव्हते. डोक्यात हेल्मेट नाही, संरक्षण पट्टा नाही, सुमारे 70 फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या या जलकुंभावरून मोरे खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मोरे हे कासवा गावातील रहिवासी असून ते दररोज अप-डाऊन करीत होते. शनिवारी सुध्दा ते कामावर सकाळीच 9 वाजता आले होते. जलकुंभाच्या स्लॅबचे काम करीत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोरे जलकुंभावरून खाली पडताच कर्मचार्‍यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. कर्मचार्‍यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र मोरे यांचा मृत्यू झाला होता. मृत मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. कासवा येथे वसंत मोरे याच्या मृत्यूची माहिती मिळताच तेथूनही ग्रामस्थांनी दवाखान्यात गर्दी केली होती. यापूर्वीही सुध्दा याच जलकुंभावरून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना या गेल्या तीन वर्षात घडल्या आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !