वाकडी येथे वयोवृद्धेचा खून : पोलिसांकडून कसून तपास


Murder of elderly in Wakdi : Thorough investigation by police जामनेर : जामनेर तालुक्यातील वाकडी येथे एका 90 वर्षीय वयोवृद्धेचा अज्ञाताकडून खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, 11 मे रोजी दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान घडली. राधाबाई भालचंद परदेशी (90, रा.वाकडी, ता.जामनेर) असे खून झालेल्या वयोवृद्धेचे नाव आहे तर दागिण्यांसाठी हा खून झाल्याची प्राथमिक चर्चा आहे. दरम्यान, रविवारी सकाळी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.

खुनाचे कारण अस्पष्ट
वाकडी येथे राधाबाई परदेशी या गावात एकट्याच राहत होत्या व काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (65) हे परिवारासह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून राधाबाई या सकाळी 11 ते सव्वा 11 वाजेच्या सुमारास निघून घरी गेल्या व नंतर दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकर्‍याने खून केला. गावातील एक मुलगी राधाबाईंच्या घराजवळ आली असता तिला दरवाजा उघडा दिसला.

तिने आत जाऊन पहिले असता हा प्रकार उघड झाला. मयताच्या डोक्यावर जखमा असून अज्ञाताने त्यांचा खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला आहे. चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !