गायीच्या दूध खरेदी दरात रु.2.40 व म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

राज्यात सर्वाधिक दर देणारा जळगाव जिल्हा ठरणार : दुध संघाचा महत्वाचा निर्णय : दुध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांचे विरोधकांना कृतीतून उत्तर

0

An increase of Rs.2.40 in the purchase price of cow milk and two rupees in the purchase price of buffalo milk जळगाव : जळगाव दुध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवार, 1 मे 2024 पासून गाय व म्हशीच्या दुध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायीच्या दुध खरेदी दरात रु.2.40 ची वाढ करण्यात आली असून 3.5/8.5 फॅटसाठी रु 29.40 असा दर असेल तर म्हैस दुध खरेदी दरात देखील रु.2.00 ची वाढ केली असुन 6.0/9.0 फॅटला रु. 46.40 असा दर राहील.

दुध उत्पादकांच्या हितालाच प्राधान्य !
जागतिक पातळीवरील दूध भुकटी व लोणी चे दर खालावल्यामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सहकारी व खाजगी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या किमान 27 रुपये प्रति लिटर या दरापेक्षा कमी म्हणजे 25 रुपये पर्यंत काही दुध संघांनी दर कमी केले असताना देखील शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने आपल्या दुध खरेदी दर 27 रुपयांच्या खाली जाऊ दिले नाही. जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दुध खरेदी करणार्‍या महाराष्ट्र व गुजरात मधील सहकारी व खाजगी दुध संघांनी सुगीच्या काळात म्हणजे दुधाची मागणी कमी व पुरवठा जास्त असतो अश्या वेळी देखील जळगाव दुध संघापेक्षा कमी दराने दुध खरेदी केली होती. मात्र जळगाव दुध संघाने या काळात देखील दुध उत्पादकांच्या हितालाच प्राधान्य दिले आहे. आता नुकत्याच झालेल्या दुध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवार, 1 मे 2024 पासून गाय व म्हशीच्या दुध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायीच्या दुध खरेदी दरात रु.2.40 ची वाढ करण्यात आली असून 3.5/8.5 फॅटसाठी रु 29.40 असा दर असेल तर म्हैस दुध खरेदी दरात देखील रु.2.00 ची वाढ केली असुन 6.0/9.0 फॅटला रु. 46.40 असा दर राहील.

निर्णयाचे शेतकर्‍यांकडून स्वागत
आता जळगाव जिल्हा दुध संघ हा महाराष्ट्र व गुजरात मधील नामांकित दूध संघांपेक्षा जास्त दर देणारा दुध संघ ठरला आहे. जळगाव दुध संघाच्या या निर्णयाचे शेतकर्‍यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत असून त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिलदादा पाटील व चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण व संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.

दुध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांचे बोलबच्चन नाही तर कृतीतून उत्तर
जागतिक स्तरावर दुध भुकटी व लोण्याचे दर कमी झाल्याने त्याचा साहजिक परिणाम दुध खरेदी दरावर होतो. राज्यातील सर्वच खाजगी व सहकारी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. मात्र याचे देखील राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला वास्तविक याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर दुध संघ निवडणुकांच्या माध्यमातून दुध संघात सहभागी होणे हा पर्याय असतो मात्र गेल्या 10 वर्षात 2 वेळा दुध संघाच्या निवडणुका झाल्या, मात्र आता दुध दरावर पत्रकार परिषदा घेणारे तेव्हा सक्रीय का नव्हते, मागील संचालक मंडळाच्या काळात तर बटर (लोणी) मध्ये कोट्यावधींचा अपहार झाला तेव्हा देखील हि मंडळी शांत का होती असा प्रश्न सर्वसामान्य दुध उत्पादक शेतकरी विचारत आहे. याउलट आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विरोधात असताना दुध संघातील कोट्यावधींचा अपहार उघडकीस आणला व प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होऊन संचालक मंडळात स्थान मिळवले व दुध संघाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे काम केले आहे तेदेखील कुठलाही गाजावाजा न करता. दुध दराच्या बाबत देखील त्यांनी बोलबच्चनगिरी ला उत्तर न देता थेट कृतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे व राज्यातील सर्वाधिक दुध खरेदी दर देण्याचा प्रयत्न केला आहे.

दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध – आमदार मंगेश चव्हाण
जळगाव जिल्हा दूध संघ हा शेतकरी दूध उत्पादकांचा संघ आहे. तो पारदर्शक व सुव्यवस्थित चालविण्याची आमची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहोत. जागतिक स्तरावर दूध भुकटी व लोणी याचे दर खालावल्याने काही काळ दूध खरेदी दरात कपात केली होती मात्र दूध उत्पादकांचे हित लक्षात घेता वरील दूध दरवाढ करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सहकारी व खाजगी दुध संघांपेक्षा जास्त दर जळगाव दुध संघ देत आहे. संघाचा कारभार करताना गेल्या वर्षभरात अतिशय शिस्तीने व काटेकोरपणे पुढे जात आहोत. त्यामुळे संघाच्या अनावश्यक खर्चात कपात व नफ्यात वाढ होत आहे. याची चांगली फळे येणार्‍या काळात सर्व दुध उत्पादकांना, संस्थाना चाखायला मिळतील असा मला ठाम विश्वास असल्याचे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, मर्या.चे चेअरमन व आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामांकित दुध संघांचे गायीचे दुध खरेदी दर –
कात्रज दुध संघ पुणे – 26.00
संगमनेर दुध संघ (राजहंस ) – 27.00
गोदावरी संघ, कोपरगाव – 27.00
महानंद दुध – 26.00
पंचमहल दुध – 25.50
भरूच दुध – 27.00
सुमूल दुध – 27.00
अमर दुध ( बोदवड ) – 28.00
जळगाव दुध संघ (विकास) – 29.40


कॉपी करू नका.