दादर-गोरखपूर, मुंबई-दानापूरसाठी अनारक्षित एक्स्प्रेस धावणार

0

Unreserved express will run for Dadar-Gorakhpur, Mumbai-Danapur भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशाासनाकडून दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानानूर दरम्यान 12 अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांच्या फेर्‍या होेणार आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

अनारक्षीत गाडीच्या सहा फेर्‍या होणार
दादर-गोरखपूर अनारक्षित विशेष गाडीच्या सहा फेर्‍या होतील. यात 01015 अनारक्षित विशेष गाडी 1 मे आणि 4 मे या दिवशी दादर येथून रात्री 11.30 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे. या गाडीच्या तीन फेर्‍या होतील तर 01016 अनारक्षित विशेष गाडी गोरखपूर येथून 29 एप्रिल, 3 व दि. 6 मे या दिवशी दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी रात्री 12.25 वाजता दादर येथे पोहोचेल. या गाडीच्या तीन फेर्‍या होतील. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबेल. या गाडीला 18 डबे जोडण्यात येणार आहेत.


कॉपी करू नका.