भुसावळ मतदारसंघातील दोन लाख 97 हजार मतदारांना घरपोच मिळणार ‘वोटर स्लीप’

बीएलओकडून होणार अंमलबजावणी ; 1 मे नंतर सुरू होणार प्रक्रिया

0

Two lakh 97 thousand voters of Bhusawal Constituency will get ‘Voter Sleep’ at home. भुसावळ : मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक विभागाकडून 2 लाख 97 हजार मतदारांना घरपोच ‘वोटर स्लीप’ दिली जाणार आहे. प्रत्येकाच्या घरी बीएलओ पोहोचून नाव, मतदार यादीतील क्रमांक असलेली स्लीप देणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी त्रास होणार नाही. मतदान केंद्र शोधणे व मतदान करणे यामुळे सुलभ होणार आहे.

मतदारांना घरपोच मिळणार स्लीप
पूर्वी पक्षांकडून तसेच उमेदवार प्रत्येकाच्या घरी प्रचारार्थ फिरून ‘वोटर स्लीप’ वाटप केली जात होती तसेच मतदान केंद्रांसमोरदेखील बूथ लावून मतदारांना त्यांचा मतदार यादीतील क्रमांक शोधून दिला जात होता परंतु निवडणूक विभागाकडूनच आता ही सुविधा मतदारांना देण्यात आली आहे. यासाठी बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलओ प्रत्येक मतदारांच्या घरी पोहोचून त्यांना ‘व्होटर स्लीप’ काढून देणार आहे त्यामुळे मतदारांना आपला मतदान क्रमांक मिळाल्याने थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागातर्फे 1 नंतर ‘व्होटर स्लीप’ घरपोच देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

मतदान केंद्रांवर राहणार ‘हिरकणी कक्ष’
मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांकरीता व्हिलचेअरची सुविधा राहणार आहे. याशिवाय स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ प्रत्येक मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदार व कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेकरिता वैद्यकीय किट दिली जाणार आहे.


कॉपी करू नका.