मुंबई ते दानापूर, गोरखपूरसाठी आठ विशेष एसी गाड्या धावणार !

0

भुसावळ : रेल्वे गाड्यांना उन्हाळ्याच्या सुटीमुळे होत असलेली गर्दी पाहता मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते दानापूर, गोरखपूर दरम्यान आठ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष रेल्वे गाडीच्या चार फेर्‍या होतील. यात 01107 वातानुकूलित विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मंगळवार, 30 एप्रिल आणि शनिवार, 4 मे रोजी रात्री 11.20 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. 01108 वातानुकूलीत विशेष गाडी दानापूर येथून गुरुवार, 2 मे आणि सोमवार, 6 मे या दिवशी दुपारी एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबा देण्यात आला आहे.

मुंबई-दानापूर विशेष गाडी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष रेल्वे गाडीच्या चार फेर्‍या होतील. यात 01109 वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 2 मे रोजी रात्री 11.50 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 8.20 वाजता पोहोचेल. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील तसेच 01110 वातानुकूलित विशेष गाडी गोरखपूर येथून मंगळवार, 30 एप्रिलला आणि 4 मे यादिवशी सकाळी 11.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसर्‍या दिवशी रात्री 11.15 वाजता पोहोचेल. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.