रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : बडनेरा-नाशिक, भुसावळ-वर्धा मेमू उद्या रद्द

नांदुरा-जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिग कामासाठी उद्या ब्लॉक : सहा गाड्या उशिराने धावणार

0

Badnera-Nashik, Bhusawal-Wardha MEMU canceled tomorrow भुसावळ  : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, 6 मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ अकोला मार्गावर अप-डाऊन लाईनीवरील सहा मेल, एक्स्प्रेस गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेे तर बडनेरा-नाशिक, भुसावळ-वर्धा मेमू अश्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सुमारे अडीच तास ब्लॉक
भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब या दरम्यान सोमवार, 6 मे रोजी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या कामासाठी ब्लॉक घेतला जात आहे. हा ब्लॉक दुपारी 2.20 ते 4.50 वाजेपर्यत राहणार आहे. यामुळे या काळात येणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविणार आहे. यात डाऊन मार्गावरील गाड्यांमधील ट्रेन क्रमांक 07116 जयपूर ते हैदराबाद विशेष ट्रेन 2.45 तास थांबवली जाईल तर गाडी क्रमांक 20804 अजमेर ते पुरी एक्सप्रेस दोन तास थांबविली जाणार आहे. गाडी क्रमांक 01140 मडगांव ते नागपूर विशेष गाडी 1.45 तास थांबविली जाणार आहे.

अप मार्गावरील गाड्या
गाडी 11040 गोंदिया ते कोल्हापूर एक्सप्रेस एक तास थांबविली जाणार आहे, 01366 बडनेरा ते भुसावळ मेमू 1.10 तास थांबविली जाणार आहे. 12485 नांदेड ते श्री गंगानगर एक्सप्रेस 35 मिनिटे थांबविणार आहे.

या गाड्या केल्या रद्द
ब्लॉकचा फटका सोमवार, 6 मे या दिवशी चार रेल्वे गाड्यांना बसला असून त्या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे. गाडी क्रमांक 11121 वर्धा ते भुसावळ, गाडी क्रमांक 11122 भुसावळ ते वर्धा, गाडी क्रमांक 01212 नाशिक ते बडनेरा मेमू व गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक मेमू या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


कॉपी करू नका.