भुसावळ मतदारसंघात 107 वृद्ध मतदारांनी केले गृह मतदान

0

भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, 85 वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही अशा अपंग, अंध, आजाराने ग्रासलेल्या मतदारांसाठी शनिवारी गृह मतदान घेण्यात आले. 115 मतदारांपैकी 107 मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुणीही मतदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी संबंधित मतदारांच्या घरी नेमून दिलेल्या टीमने मतदारांना मतदानाविषयी माहिती देऊन त्यांचेकडून पोस्टल बॅलेट पेपरवर मत नोंदवून ती मतपेटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा केली. शनिवारी एकूण 115 मतदारंपैकी 107 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

14 टीम मतदारांच्या दारी
शनिवारी जे मतदार घरी उपलब्ध नव्हते त्यांच्यासाठी रविवार, 5 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नेमून दिलेल्या पथकामध्ये बीएलओ, पोलीस, एक मतदान अधिकारी, झोनल, व्हिडिओग्राफर, मायक्रो ऑब्झर्व्हर यांची टीम होती. अशा एकूण 14 टीमने विविध ठिकाणी संबंधिताच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. मतदान व्यवस्थित पार पडले, अशी माहिती प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. त्यावेळी गट विकास अधिकारी सचिन पानझाडे व निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते. रविवारी राहिलेल्या 8 मतदारांकडे पथक जाऊन मतदान करून घेणार आहे.


कॉपी करू नका.