रावेर लोकसभेत यंदा परिवर्तन अटळ : वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांचा दावा

बोदवडला कॉर्नर सभा : दहा वर्षात विकास न झाल्यावा दावा

0

बोदवड : रावेर लोकसभेत यावेळी परिवर्तन निश्चितपणे होणार असून वंचित बहुजन आघाडीला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास वंचित आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी बोदवड शहरात शनिवारी झालेल्या कॉर्नर सभेत व्यक्त केला.

परिवर्तन होणार : संजय ब्राह्मणे यांचा विश्वास
यावेळच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास संजय ब्राह्मणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी ब्राह्मणे म्हणाले की, खडसे परिवाराने बोदवड तालुक्याची फसवणूक केली आहे. सुनेला खासदारकी मिळण्यासाठी खडसे यांनी राष्ट्रवादी सोडली आहे. गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा कुठलाही विकास झालेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यावरही त्यांनी टिका केली.

गांधी चौकात कॉर्नर सभा
शनिवारी गांधी चौकात झालेल्या कॉर्नर सभेत युवा जिल्हाध्यक्ष बाळा (विजय) पवार व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, तालुकाध्यक्ष सुपडा निकम, युवा जिल्हा सचिव शाहरूख शेख, महिला तालुकाध्यक्ष प्रमिला बोदडे, आशिष गुरचळ, सद्दाम कुरेशी, सुभाष इंगळे, नागसेन सुरळकर, सुनीता पालवे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.