रावेर लोकसभेत मोठी घडामोड : मुस्लिम समाजाचे नेते गयासउद्दीन काझी यांचा वंचित आघाडीला पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांना विजयी करण्याचे आवाहन

0

रावेर : रावेर मुस्लिम पंच मंडळाचे सदस्य, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गयासउद्दीन काझी यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांना रविवारी जाहीर पाठिंबा दिला आहे. आगामी काळात रावेर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण मुस्लिम समुदाय वंचित बहुजन आघाडीसोबत भक्कमपणे उभा राहणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. दरम्यान, वंचित आघाडीची ताकद या पाठिंब्यामुळे आणखी दुणावली आहे. रावेर लोकसभेत वंचित आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

एकाही जागेवर मुस्लीमांना उमेदवारी नाही
यावेळी बोलतांना काझी यांनी भाजपसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. भाजप व महाविकास आघाडी ही मुस्लिम समुदायाचा उघड शत्रू आहे. 70 वर्षात् मुस्लिम समाजाने काँग्रेसला भरभरून मतदान दिले पण महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 48 पैकी एकाही जागेवर मुस्लिम समुदायाला उमेदवारी दिलेली नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. महाविकास आघाडीचे मुस्लिम विरोधी धोरण हे महाराष्ट्रातील मुसलमानांनी ओळखले असून आगामी काळात भाजप बरोबरच महाविकास आघाडीला देखील महाराष्ट्रातील मुस्लिम समाज धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय ब्राह्मणे यांचा विजय होणार
रावेर लोकसभेतील वंचितचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन काझभ यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे, जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा संघटक बबन कांबळे, करण तायडे, विकास इंगळे यांच्यासह मुस्लिम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.