यावल तालुक्यातील आदिवासी भागात विकासाच्या योजना राबवणार : संजय ब्राह्मणे

यावल तालुक्यात प्रचार दौरा : वंचित आघाडीला मतदान करण्याचे आवाहन

0

यावल : यावल तालुक्यातील आदिवासी भागात विकासाच्या विविध योजना राबवून आदिवासी बांधवांचे जीवन समृद्ध करण्याची ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी दिली. रावेर लोकसभेच्या आखाड्यात वंचित बहुजन आघाडीने मोठे आव्हान प्रस्थापितासह महाविकास आघाडीपुढे निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीतर्फे यावल तालुक्यातील प्रत्येक गावासह खेड्या-पाड्यांवर प्रचार रॅली काढण्यात येत आहे. यावेळी उमेदवार ब्राह्मणे हे मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेत आहेत.

रस्त्यांची दुरवस्था थांबवणार !
वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे भल्या सकाळीच कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी बाहेर पडत आहे. गेल्या दोन दिवसात त्यांनी यावल शहरासह तालुक्यातील मनवेल, डांभूर्णी, किनगाव, उंटावद, चिंचोली भागात प्रचार दौरा करीत नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. यावेळी ते म्हणाले की, शेतकर्‍यांना शेती माल ने आण करण्यासाठी रस्त्यांची चांगली सुविधा नाही मात्र वंचितला मतदारांनी संधी दिल्यास रस्त्यांचे जाळे विणण्यात येईल तसेच शेतकर्‍यांसाठी दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकर्‍यांमध्ये समृद्धी आणण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प राबवणार असून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न असतील व यावल तालुक्यात आरोग्य सुविधा अधिक बळकट करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
वंचितचे जळगाव जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.