रावेरात श्रीराम पाटलांची वाढली ताकद : भारताचा कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) बिनशर्त पाठिंबा

0

रावेर : रावेर लोकसभेचा आखाडा दिवसागणिक तापत असून दररोज नवनवीन घडामोडी येथे घडत आहेत. गेल्या दहा वर्षात केंद्रात भाजपचे सरकार असतानाही मतदारसंघात मोठा उद्योग वा प्रकल्प न आल्याने मतदारसंघाचा या काळात विकास खुंटला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत सक्षम उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाने विनाअट व बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

सक्षम उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन
रावेर मतदार संघात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. केळी उत्पादक शेतकरी विविध संकटांनी खचला आहे. सामान्य नागरिक महागाईत भरडला जात आहे. मात्र मोदी सरकारचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहे. विद्यमान खासदार यांनी ठोस जनतेच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. केळी पीक विमा, महामार्ग दुरुस्ती, रेल्वेचे प्रश्न, बेरोजगारीसाठी उद्योगधंद हे प्रश्न सोडविण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत त्यामुळे या होणार्‍या निवडणुकीत सक्षम उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाने विनाअट व बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पत्र श्रीराम पाटील यांना भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राज्य सदस्य कॉ.दादा रायपुरे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी दिले आहे.


कॉपी करू नका.