जळगावात बंगाली सुवर्ण कारागीराचा 13 लाखांच्या सोन्यावर डल्ला

0

In Jalgaon, a Bengali gold craftsman stole 13 lakhs worth of gold जळगाव : दागिणे बनवण्यासाठी सोने दिल्यानंतर बंगाली कारागीराने 12 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोने गायब केल्याचा प्रकार आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये घडला. बंगाली सोने कारागीराविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुष्पेंद्र उर्फ सुदीप शेखर बेरा (44, रा.मालंचा बेंनियाजोला, खानाकूल-1, पश्चिम गोषपूर, जि.हुगळी, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बंगाली कारागीराचे नाव आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील आर.सी. बाफना ज्वेलर्स दालनातील कारागीर पुष्पेंद्र बेरा याच्याकडे 287.430 ग्रॅम सोन्याचे मटेरिअल दिले होते. 4 मे रोजी स्टॉक तपासणी सुरू असताना पुष्पेंद्र याला दिलेल्या सोन्यापैकी केवळ 92.300 ग्रॅम एवढेच सोने आढळले. उर्वरित 195.130 ग्रॅम वजनाचे सोने कमी असल्याने पुष्पेंद्र याने 12 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोने गायब केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शोरुमचे फ्लोअर मॅनेजर गणेश काळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पुष्पेंद्र बेरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास रवींद्र बोदवडे करीत आहेत.


कॉपी करू नका.