रणरणत्या उन्हातही वंचित आघाडीचा गावा-गावात प्रचार

संजय ब्राह्मणे यांच्या विजयासाठी कार्यकर्ते मैदानात : रावेर तालुक्यात प्रचार दौरा

0

रावेर : रावेर लोकसभेचा आखाडा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात तापला आहे. भाजपा व महाविकास आघाडीपुढे वंचित आघाडीने आपले कडवे आव्हान निर्माण केले असतानाच उमेदवाराचा संकल्प व विकासाचे व्हिजन सांगण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. 44 अंश तापमानातही कार्यकर्ते रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत आहे. रावेर तालुक्यातील बलवाडीसह परिसरातील गावा-गावात वंचितचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले व्हिजन मतदारापर्यंत ते पोहोचवत असून वाड्या-वस्त्यांमध्ये मतदारांकडूनही उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्यासह कार्यकर्त्यांचे स्वागत होत आहे.

प्रचारात घेतली आघाडी
वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला आहे शिवाय गावा-गावात प्रचार रॅली निघत असताना आता रीक्षाद्वारेदेखील प्रचार केला जात आहे.

44 अंश तापमापनत प्रज्ञा सूर्याची ही लेकरं अत्यंत रखरखत्या उन्हात बाळासाहेबांचा आदेश शिरसंधान मानून वंचित बहुजन आघाडीच रावेर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार इंजि. संजय पंडित ब्राम्हणे यांच्या प्रचाराची रॅली घेऊन गावा-गावात पोहोचत आहे. डोअर टू डोअर,आणि होम टू होम असा प्रचार व प्रसार करतांना वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्त दिसून येत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संजय ब्राह्मणे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे.

वंचित आघाडी सशक्त पर्याय
प्रचार रॅलीला उस्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. वंचित बहुजन आघाडीची शोषित, पीडित, वंचित समाजाविषयी लढत असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची असलेली भूमिका नागरिकांना पटवून दिली जात आहे शिवाय रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव सशक्त पर्याय असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी मतदारांना पटवून दिले.

 


कॉपी करू नका.