एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या बांधल्या मुसक्या

0

MIDC police arrested two-wheeler thief जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी एका संशयित चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.शहरातील पांडे डेअरी चौकातील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या परिसरातून आरोपीने दुचाकी लांबवली होती. महेश राजेश गायकवाड (वय- 20, रा. मेहरुण, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरात 22 डिसेंबर 2023 रोजी तक्रारदार राहुल संजय वाघ (रा.जयजवान चौक, मेहरूण, जळगाव) हा त्याची दुचाकी (एम.एच. 19 डी.एल.1594) ही पांडे चौकातील पोस्ट कार्यालयाच्या गेटबाहेर लावून पोस्टातील काम करण्यासाठी गेले. काम आटोपून परतले असता त्यांना त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले म्हणून त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली.

संशयीत जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
संशयीत आरोपी महेश राजेश गायकवाड (20, रा.मेहरुण, रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा संशयीतरित्या दुचाकी रामेश्वर कॉलनी येथे घेऊन फिरत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, किशोर पाटील, सचिन पाटील, विनोद आस्कार, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील आदींनी केली. संशयितांकडून जप्त दुचाकी जप्त करुन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.


कॉपी करू नका.