जळगावच्या सुरेश नगरात घरफोडी : 69 हजारांचा मुद्देमाल लांबवला

0

Burglary in Suresh Nagar, Jalgaon : Property worth 69,000 was recovered जळगाव : कुलूपबंद घर नजरेस पडल्यानंतर चोरटे ते हमखास फोडतात, याचा प्रत्यय अनेक वेळा शहरवायांना आला आहे. सुरेश नगरातील लाईफ स्टाईल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये फळ विक्रेत्याचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे 69 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. गुरुवार, 2 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवार, 3 रोजी तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर
विलास मुरलीधर चौधरी (48, रा.लाईफ स्टाईल रेसीडेन्सी, जळगाव) हे फळे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घराला कुलूप लावून चौधरी हे 5.30 वाजता घराबाहेर पडले. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश केला. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत मुद्देमालाचा शोध घेतला. सोन्या-चांदीचे दागिने तसेच 45 हजारांची रोकड असा सुमारे 69 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांचा हाती लागला. त्यानंतर चोरट्यांनी पलायन केले. रात्री 10.30 वाजता विलास चौधरी हे घरी आले असता त्यांना घरातील सामान विखरुन पडलेला दिसला. दागिने व रोकड गायब झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहेत.


कॉपी करू नका.