12 हजारांची लाच भोवली : धुळ्यातील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हवालदारासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

0

12,000 bribe: Private punter along with constable of Azadnagar police station in Dhule in ACB’s net धुळे : पानटपरीवर गुटखा विक्री होवू देण्याच्या व गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 12 हजारांची लाच पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पोलीस दलातील लाचखोर हादरले आहेत. अझरुद्दीन शेख असे लाचखोर पोलीस कर्मचार्‍याचे तर अब्दुल बासीत अन्सारी असे खाजगी पंटराचे नाव आहे. विशेष म्हणजे शेख हा बंदोबस्तावर असताना त्याला एसीबीने अटक केली.

पानटपरीवर स्वीकारली लाच
आरोपी शेख याने यापूर्वीच 17 हजार रुपये पारोळा रोडवर स्वीकारले होते तर उर्वरीत 12 हजार रुपये घेण्यासाठी खाजगी पंटर अन्सारी याला पारोळत्त रोडवरील टपरीवर पाठवण्यात आले. पंटराने लाच स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली व नंतर अन्सारी याला बंदोबस्त करीत असताना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.