54 हजारांची लाच घेताना पिंपळनेर बालविकास प्रकल्प अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

Pimpalner child development project officer Dhule caught in ACB’s net while taking bribe of 54 thousand धुळे : प्रवास भत्ता बिलाच्या एकूण दहा टक्के लाच मागून पहिल्या हप्त्यापोटी 54 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पिंपळनेरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे (39) यांना मंगळवारी सायंकाळी धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
यातील तक्रारदार अधिनस्त पर्यवेक्षिका आहेत. आरोपी बनसोडे या एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या प्रभारी अधिकारी असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरणाचे अधिकार त्यांना आहेत. तक्रारदार व त्यांच्या कार्यालयातील सहकारी कर्मचार्‍यांचे प्रवास भत्त्याची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात अदा रकमेच्या 10 टक्के लाच मागणी आरोपीने केली होती. प्रवास भत्त्यापोटी मंजूर रुपये नऊ लाख 37 हजार 533 रुपये रक्कमेच्या 10 टक्के रक्कम रुपये 93 हजार रुपये लाच 6 मे रोजी मागण्यात आली व पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. लाच रकमेपैकी पहिला हप्ता रुपये 54 हजार रुपये मंगळवारी स्वीकारताना शुभांगी बनसोडे यांना पकडण्यात आले.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, चालक जगदीश बडगुजर आदींनी हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.