जळगावात जुन्या वादातून तरुणाची हत्या : चौघांना अटक


Youth killed due to old dispute in Jalgaon: Four arrested जळगाव : जळगावात जुन्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे बुधवारी 22 मे रोजी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत किशोर अशोक सोनवणे (33, रा.बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला होता. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गुरुवारी, 23 मे रोजी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करीत आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेहाला हात लावणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर शनीपेठ पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली आहे.

जुन्या वादातून केली हत्या
किशोर सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला होता. किशोरचा काही जणांसोबत जुना वाद होता. बुधवार, 22 मे रोजी रात्री हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री 10.45 वाजेच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला तर रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आंदोलनानंतर चौघांना अटक
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात चार जणांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवार, 23 मे रोजी जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले होते. जोपर्यंत मारेकर्‍यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कुटुंबीयांसह इतर नातेवाईकांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !