रस्त्यावर नग्नावस्थेत उतरले जोडपे ; नागपुरात व्हिडीओ व्हायरल


A couple came down naked on the street ; Video viral in Nagpur नागपूर : कारमधील एक जोडपे नग्नावस्थेत रस्त्यावर उतरले व त्याबाबतचा व्हिडिओ नागपूरात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हायरल व्हिडीओ नागपुरातील लक्ष्मीनगर चौकाजवळील असल्याचे सांगण्यात आले.

एकमेकांची माफि मागतानाचा व्हिडिओ व्हायरल
नागपुरातील काही दुचाकीस्वार तरुणांनी हा व्हिडीओ काढला आहे. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाकडून श्रद्धानंदपेठ चौकाकडे चौकाकडे जाणार्‍या मार्गावर एका कारमधून एक तरुण भांडण करत खाली उतरला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. काही वेळातच नग्नावस्थेत एक महिलादेखील खाली उतरली व त्या तरुणाची माफी मागत होती. त्यानंतर तरुण फुटपाथच्या शेजारी असलेल्या एका मोडक्या घराकडे निघाला. त्यावेळी रस्त्यावर तुरळक वर्दळ होती व दोन दुचाकीस्वारांनी याचा व्हिडीओ बनविला.

सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच प्रसारित झाला. याबाबत बजाजनगर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलिसांनी व्हिडीओवरून दोघांचा शोध लावला व त्यांना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. पांढरपेशा समजल्या जाणार्‍या भागात असा प्रकार होत असेल तर तो निश्चितपणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !