भरधाव ट्रकच्या धडकेने धुळ्यात पत्रकाराचा मृत्यू

Journalist dies in Dhula after being hit by a speeding truck धुळे : भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकीला धडक दिल्यानंतर जीवाच्या भीतीने पत्रकाराने वाहनाबाहेर उडी घेतली मात्र ट्रकच्या चाकात आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास गरताडबारीजवळ घडला. हर्षल भदाणे हे मुंबईतील माध्यमात कार्यरत होते व ते धुळे जिल्ह्यातील बोरकुंडचे रहिवासी होते.
जागीच झाला मृत्यू
सोमवारी सायंकाळी बोरकुंड गावाकडे हर्षल भदाणे हे निघाले होते. गरताडबारीजवळ ते कामानिमित्त रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून थांबले होते व त्याचवेळी भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला धडक दिली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी वाहनातून उडी मारली मात्र त्याचवेळी ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.
जमावाची ट्रकवर दगडफेक
अपघाताच्या घटनेनंतर ट्रक चालकाने दोन वाहनांनादेखील धडक दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. यानंतर ट्रकचालक पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
