कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा सापडले 46 मोबाईल


46 mobile phones found again in Kolhapur’s Kalamba Jail कोल्हापूर (7 ऑगस्ट 2024) : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 46 मोबाइल सापडल्यानंतर खळबळ उडाली. भोंगळ कारभारामुळे वारंवार कळंबा कारागृह चर्चेत आहे आहे तर मोबाइल वापरणारा एकही कैदी कारागृह प्रशासनाला सापडला नाही हेदेखील विशेष! 5 मे ते 6 ऑगस्ट दरम्यान सापडलेल्या मोबाईलबद्दल तुरुंग अधिकारी अविनाश जयसिंग भोई (42, रा.कळंबा) यांनी बुधवार, 7 ऑगस्ट रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कारागृहाची झडती घेवून तपास करणार
एक सीमकार्ड आणि चार बॅटरीही कारागृह पोलिसांच्या हाती लागल्या मात्र, हे मोबाइल कोणाचे आहेत ? ते कारागृहात कोणी आणले ? त्याचा वापर कोणी केला ? याचा शोध पोलिसांना लागला नाही. तुरुंग अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांना अज्ञातावर गुन्हा दाखल केला. कारागृहाची झडती घेऊन अधिक तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिली.

कारागृहात मोबाइल जाऊ नयेत, यासाठी प्रवेशद्वारावर सर्व कैदी आणि कर्मचार्‍यांची कसून तपासणी केली जाते. त्यानंतरही मोबाइल आत कसे पोहोचतात हा संशोधनाचा विषय आहे.

कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी दोन अधिकार्‍यांसह 12 जणांवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई केली. दोन अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. त्यानंतरही कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा वापर सुरूच आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !