एक कोटी 30 लाखांची अपसंपदा : नाशिक महापालिकेच्या सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकार्‍यासह दोघांविरोधात गुन्हा


Misappropriation of 1 Crore 30 Lakhs: A case against the retired Chief Fire Officer of Nashik Municipal Corporation and two नाशिक (8 ऑगस्ट 2024)  : कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल एक कोटी 31 लाख 42 हजार 869 रुपयांचे उत्पन्न मिळवल्याप्रकरणी नाशिक महापालिकेतील सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल चुडामण महाजन व खाजगी इसम निशा अनिल महाजन यांच्याविरोधात नाशिक शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन नारायण पाटील यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली.

असे आहे अपसंपदा प्रकरण
अनिल चुडामान महाजन हे नाशिक महापालिकेत असताना त्यांनी 22 ऑक्टोबर 1986 ते दिनांक 31 मे 2018 दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपयेांची माया जमवली. ती कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल 42 टक्के जास्त आहे. अपसंपदा जमा करण्यासाठी त्यांना निशा अनिल महाजन यांनीदेखील साथ दिल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्ड, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !