शिवरायांचा अवमान : भुसावळात काँग्रेसतर्फे जोडे मारो आंदोलन
पुतळ्यास अभिवादन करीत भाजपा सरकारविरोधात निदर्शने
भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. महायुती भाजपच्या काळातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला. याप्रकरणी सोमवारी शहर काँग्रेस कमेटीने शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन राज्य सरकारचा निषेध करीत जोडेमारो आंदोलन करण्यात आला.
काँग्रेस कमेटीकडून सत्ताधार्यांचा निषेध
भाजपा सरकारच्या काळात आठ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजगड येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले परंतु भाजपा महायुती सरकारच्या भष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाला. या घटनेचा भुसावळ शहर काँग्रेस कमेटीने तीव्र शब्दात निषेध केला.
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, तालुकाध्यक्ष शैलेश बोदोडे यांनी शिंदे-फडणवीस यांच्या पोस्टरला जोडे मारुन निषेध केला. यावेळी घरेलू कामगार अध्यक्ष राजेश डोंगरदिवे, एस. सी. विभाग प्रदेश सचिव भगवान मेढे, जिल्हा एस.सी.अध्यक्ष अॅड.कैलास शेळके, शहर सरचिटणीस संतोष साळवे, सलीम गवळी, महिला शहराध्यक्ष यास्मीन बी., शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, शहर उपाध्यक्ष हमीद शेख, जॉनी गवळी, अजगर भाई, सागर वानखेडे, राम अवतार परदेशी, एस.टी.विभाग शहराध्यक्ष अन्वर तडवी, वरणगाव शहर काँग्रेस अध्यक्ष अशपाक काझी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष देशमुख आदींची उपस्थिती होती.