उपराजधानी नागपूरला मिळाले तीन उपायुक्त

0

Sub-capital Nagpur got three Deputy Commissioners नागपूर (6 सप्टेंबर 2024) : राज्याची उपराजधानी नागपूर येथे अलीकडेच तीन उपायुक्त नियुक्त करण्यात आले आहे. भंडार्‍यातून मुंबईला बदली करण्यात आलेले लोहित मतानी यांची नागपूरात नियुक्ती करण्यात आली.

तीन अधिकार्‍यांची नागपूरात नियुक्ती
गृहविभागाने गुरुवारी आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीची यादी जाहीर केली. 2020 च्या बॅचमधील महक स्वामी तसेच निथीपुडी रश्मिता राव यांची नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. लोहित मतानी यांनी यापूर्वी नागपुरात काम केले आहे. नागपुरातूनच त्यांची भंडारा येथे अधीक्षकपदी बदली झाली होती. तेथून त्यांची 22 ऑगस्ट रोजी मुंबईत सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली होती. केवळ दोन आठवड्यातच त्यांची परत नागपुरात बदली करण्यात आली आहे. दरम्यान नागपुरातील उपायुक्त निमित गोयल यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे.

धुळ्याचे ऋषिकेश रेड्डी गडचिरोलीत अपर अधीक्षक
विदर्भालादेखील नवीन दमाचे अधिकारी मिळाले आहेत. धुळ्यातील सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांची गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. 2019 च्या बॅचचे सुशांत सिंह यांची भारत राखीव बटालियन-5 अकोला येथील समादेशक म्हणून बदली झाली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे मुंबईत सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासोबतच 2021 च्या बॅचचे दीपक अग्रवाल यांना नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी, शुभम कुमार यांना अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, वृष्टी जैन यांना उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे.

 


कॉपी करू नका.