भुसावळ शहरातील शासकिय अधिकार्यांना पडला लोकशाही दिनाचा विसर !
भुसावळ (16 सप्टेंबर 2024) : शासकिय कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसर्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश आहेत मात्र मागील वर्षापासून तहसील कार्यालयातील अधिकार्यांना या दिनाचा विसर पडला आहे. याबाबत येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्ज लेखी स्वरूपात दाखल केला आहे.
जिल्हाधिकार्यांकडून कारवाईची अपेक्षा
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी 16 सप्टेंबर 2024 रोजी लोकशाही दिनात तक्रार घेवून गेल्यानंतर तेथे केवळ तहसीलदार हजर होत्या मात्र कोणत्याही विभागाचा अधिकारी उपस्थित नव्हता. याबाबत केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केला. गतर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार यांना लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले मात्र त्यावेळीही लोकशाही दिनाचा विसर अधिकार्यांना पडला होता. यावर्षी देखील लोकशाही दिनाचा अधिकार्यांना विसर पडला. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

