बच्चू कडूंचा दावा : शरद पवारांकडे काही दिवसांनी अजित पवार दिसणार !


मुंबई (16 सप्टेंबर 2024) : स्पष्ट वक्तेपणामुळे आमदार बच्चू कडू राज्याला परीचीत आहेत. अशातच त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी यांनी अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार गटात जातील व अजित पवारदेखील शरद पवारांकडे काही दिवसांनी दिसतील, असे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.

हा तर ज्याचा त्याचा निर्णय
बच्चू कडू म्हणाले की, आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारही तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय असेल, असेही ते म्हणाले.





तीन पक्षाच्या सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई
महायुती सरकारबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आहे. श्रेयवादाची लढाई तर होणारच आहे. भाजप म्हणतेय की, लाडकी बहीण योजना आम्ही आणली. शिंदे गट म्हणतो आम्ही आणली आणि अजित पवारांचा पक्षही ती योजना आम्ही आणली असे म्हणत आहे. पण, योजना कुणी आणली हे त्यांनाच ठरवायचे आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !