यावल तालुक्यातील वाळू तस्कर नाना कोळी स्थानबद्ध

0

Sand smugglers in Yaval taluka arrested यावल (6 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाळू माफीया नाना कोळी विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी या संदर्भातील आदेश पारित केले आहेत. फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (36, रा.कोळहावी, ता.यावल) याच्याविरोधात 9 गुन्हे दाखल आहेत.

संशयीत कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून तो एलसीबीकडे पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे तो सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांनी आदेश पारित करताच संशयीताला कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

यांनी केली कारवाई
प्रस्ताव तयार करण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्यासह तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक मैंन्नुद्दीन सय्यद, सहाय्यक फौजदार योगेंद्र मालविया, हेड कॉन्स्टेबल योगेश महाजन, समाधान पाटील, नावकर, अनिल पाटील यांनी कामकाज केले.


कॉपी करू नका.