पाडळसे येथे मोटरसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर चाकू हल्ला

0

A young man was attacked with a knife due to being hit by a motorcycle in Padalse यावल (6 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील पाडळसे गावात हॉटेल मराठा समोरून दुचाकीव्दारे 19 वर्षीय तरुण जात असताना त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणासोबत चौघांनी वाद घातला. त्याला शिविगाळ करीत मारहाण केली. एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना 3 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
पाडळसे, ता.यावल गावातील रहिवासी धनराज सुपडू भोई (19) हा तरुण 3 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दुचाकीद्वारे आपल्या घरी जात असताना हॉटेल मराठाासमोर दुचाकीचा धक्का लागल्यावरून वाद झाला आणि या तरुणाला आदेश, रोहित, नीलू व मोरे नामक चार तरुणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने त्याच्यावर कमरेखाली डाव्या बाजूला चाकूने वार करून दुखापत केली.

याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात धनराज भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे.


कॉपी करू नका.