मराठा आरक्षणाला विरोध करू नका अन्यथा पराभव निश्चित : मनोज जरांगे-पाटील

0

मुंबई  : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम आहेत. छगन भुजबळ यांनी त्यांना दिलेल्या 288 जागा लढवण्याच्या आवाहनालाही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी छगन भुजबळांना मोजत नाही. काय करायचे ते जनता ठरवेल. सर्व वेळेवर कळेल. फक्त मराठा आरक्षणाला विरोध करु नको. मी सर्वच नेत्यांना सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध करु नका. मराठा आरक्षणाला विरोध तर मग कितीही मोठा जहांगीरदार असूद्या, तो गेला म्हणजे गेला. त्याचा पराभव झाला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
रोज रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असे बोलता, तुमच्यात हिंमत असेल 288 उमेदवार उभे करा, हे आमचे आव्हान आहे. प्रत्येक वेळी बदलायचे कारण काय, आज उपोषणाला बसतात आणि दुसर्‍या दिवशी उठतात. आता जरांगे मुस्लिमांनीही आरक्षण द्या बोलतायेत, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते.

फडणवीसांवर टीका, आतापासून तंगड्या गळाल्या का ?
जरांगे पाटील म्हणाले की, माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरक्षणाबाबत लिहून घ्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही राजकीय भूमिका घेतली नाही. कोण निवडून येणार आणि कोण पडणार याचा निर्णय होणार आहे. देवेंद्र फडणवीस आतापासूनच तंगड्या गळाल्या का, ते आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार आहे. आम्ही तुमचे विरोधक नाही आणि शत्रू नाही. मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, असे जरांगे पाटील म्हणाले.

राजेंद्र राऊतांना जाणीवपूर्वक उभे केले
देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राऊत यांना उभे केले आहे. ही गरिबाची लढाई आहे. एकही मराठा सध्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत नाहीत. चिरिमिरी खाणारे आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि आरोग्य मंत्र्यांच्या बंगल्यावर एक बैठक केली आणि तिथे काहीतरी शिजले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मराठ्यांच्या आंदोलनाला धक्का लागला तर फक्त राजेंद्र राऊतच नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही राज्यात फिरु देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी थेट सांगितले.

 


कॉपी करू नका.