अडावदजवळील खुनाची जळगाव गुन्हे शाखेकडून उकल : चौकडीला बेड्या

गांजा पिल्याच्या वादातून घडली घटना : गोपनीय माहितीवरून सात दिवसात आरोपींना बेड्या

0

Jalgaon Crime Branch solves murder near Adavad : Chains to the foursome जळगाव (7 सप्टेंबर 2024) : अडावद, ता.चोपडा येथे शेतमजूराच्या झालेल्या खुनानंतर अडावद पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयीत गांजा पित असताना त्यांना हटकल्यानंतर त्यातून झालेल्या वादातून मजूराचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतागुंतीच्या या गुन्ह्याची उकल करणार्‍या तपास पथकाला पोलीस रिवॉर्ड देत त्यांचा गौरव केला.

असे आहे खून प्रकरण
चोपडा तालुक्यातील अडावद गावालगतच्या पीक पाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास जगदीश फिरंग्या सोलंकी (45, रा.पाटचारी, अडावद, ता.चोपडा) याचा खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. मयताला मारहाण झाल्याचे अंगावरील वळांवरून स्पष्ट झाल्यानंतर मयताचा मुलगा ईश्वर जगदीश सोलंकी (20, रा.पाटचारी, अडावद) याच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गांजा ओढण्याच्या वादातून खून
गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना मयत जगदीश सोलंकी यांचा गांजा ओढणार्‍यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली व चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते मुस्लिम कब्रस्थानाजवळ गांजा पित असताना मयताने तुम्ही येथे गंजोटी का बसले आहात ? अशी विचारणा केली व त्याचा राग येवून संशयीत ईरफान अब्दुल तडवी, शाहरूख ईस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजीद, कलिंदर रशीद तडवी (सर्व रा.अडावद) यांनी जगदीश सोलंकी याच्या मोटारसायकलला लाथ मारुन खाली पाडले. जगदीश हा पळू लागल्याने त्यास कब्रस्थानमधील बांधकाम केलेल्या व्हरांड्यात रूममध्ये नेल्यानंतर संशयीतांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली तसेच आरोपी कलिंदर रशीद तडवी याने दोरीने गळा आवळून ठार मारले व मृतदेह हजरत पीर पाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणून टाकला.

आरोपींना 10 पर्यंत पोलीस कोठडी
संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत. ग


कॉपी करू नका.