भुसावळातील तिकीट तपासणीच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची कुटूंबाशी झाली भेट

0

भुसावळ (7 सप्टेंबर 2024) : कुटूंबाला न सांगता अल्पवयीन मुलाने रेल्वेने प्रवास सुरू केला मात्र सतर्क तिकीट निरीक्षकामुळे ग्वालियरच्या मुलाची पुन्हा कुटूंबासोबत भेट घेतली

तिकीट निरीक्षकाची सतर्कता आली कामी
झाले असे की अल्पवयीन मुलगा ग्वालियर येथून ट्रेन क्रमांक 11078 झेलम एक्सप्रेसमध्ये बसला. बोगी क्रमांक एस- 3 ची तपासणी करताना तिकीट निरीक्षक आर.के. केशरी यांना 5 रोजी हा चिमुकला रडताना आढळल्यानंतर त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने तिकीट नसल्याचे सांगत घरातून न सांगता बाहेर पडल्याची कबुली दिली. बालकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्याने त्याने ग्वालियरचा राहणारा असल्याचे सांगितल्याने कुटूंबाचा क्रमांकही दिला. कुटूंबाशी संपर्क झाल्यानंतर त्यांना मुलगा सुरक्षित असल्याचे सांगून भुसावळात येण्याचे कळवण्यात आले. भुसावळ स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाला सूचित केल्यानंतर चाईल्ड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले व माता-पिता आल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मुलाचा ताबा देण्यात आला.


कॉपी करू नका.