रावेरचे ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर

अहमदाबाद येथे राज्यपाल व कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार सन्मान : महाराष्ट्र राज्यातून पत्रकारितेत सन्मान होणारे एकमेव पत्रकार

0

Raver’s senior journalist Krishna Patil has been awarded state level agricultural service award रावेर (8 सप्टेंबर 2024) : साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्टतर्फे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल 2024 या वर्षाचा राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अहमदाबादमध्ये पुरस्काराचे वितरण
21 सप्टेंबर रोजी गांधीनगर (अहमदाबाद ) गुजरात येथील हेलिपॅड एक्झिबिषण सेंटर मध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातून कृषी पत्रकारितेतून पुरस्कार जाहीर झालेले कृष्णा पाटील हे एकमेव पत्रकार ठरले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची घोषणा असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोळकर यांनी केली. गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेत व दहा वर्षापासून साप्ताहिक कृषिसेवकच्या माध्यमातून कृषी विस्तार व शेतकर्‍यांना मार्गदर्शन या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पेपर वाटणारा मुलगा ते यशस्वी संपादक अशी ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे.


कॉपी करू नका.