राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे ! : आमदार एकनाथराव खडसे

0

Mahavikas Aghadi government should come again in the state! : MLA Eknathrao Khadse जळगाव (8 सप्टेंबर 2024) : गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारचा अनुभव चांगला वाटत नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे व सुडबुद्धीने ईडी सीबीआय कारवाई करीत आहे त्यामुळे महायुतीचे सरकार जावे अन् महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी इच्छा आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

खडसेंनी बदलली भूमिका
आमदार खडसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टच सांगितले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे तर सूडबुद्धीने ईडी सीबीआय करवाई करत आहेत. जनतेची कामे होताना दिसत नाही’. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 46 हजार कोटी रुपये द्यावे. तसेच 46 हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्यावेत यातून स्थायी मालमत्ता निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे मला हे महायुतीचे सरकार जावे आणि पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वाटतेय, असे आमदार खडसे म्हणाले आहेत.

अर्थखात्याची केली पाठराखण
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक म्हणत टीका केली होती. यावरदेखील आमदार खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” अर्थ खात्याला पैसे खर्च करताना ते विचार करून करावे लागतात. कोणीही आले आणि पैसे मागितले आणि त्यांना दिले तर राज्याची तिजोरी रिकामी व्हायला वेळ लागणार नाही. असं म्हणत खडसे यांनी अजित पवारांच्या अर्थखात्याची पाठराखण केली.


कॉपी करू नका.