चोपडा तालुका हादरला : अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या

0

Chopra taluka shaken : Minor girl killed after torture चोपडा (8 सप्टेंबर 2024) : राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातून अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. नराधमाने अल्पवयीनावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक मुकेश पूना बारेलास (22) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दगडाने ठेचून केली हत्या
चोपडा तालुक्यातील एका गावातील रस्त्यावरून बहिणी घराकडे जात असताना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास 12 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर नराधमाने अत्याचार केला व नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना तिच्यासोबतच्या तीन लहान बहिणींनी हे पाहिल्यानंतर सर्व हकीकत गावकर्‍यांनी सांगितली. त्यानंतर गूळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळील पाटचारीकडे जाणार्‍या रस्त्यावर पीडीता मृतावस्थेत आढळली.

आरोपीला काही तासात तबेड्या
आरोपी चोपडा-आडगाव रस्त्यावर तो पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर या घटनास्थळी दाखल झाल्या.


कॉपी करू नका.