बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी उकळली : जळगावातील वकिलासह महिलेला अटक

0

Extortion of Rs 5 lakh by threatening to implicate in the crime of rape : Woman arrested along with lawyer in Jalgaon जळगाव (8 सप्टेंबर 2024) : महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती घालून एक लाख रुपये रोख व चार लाखांचा धनादेश स्वीकारणार्‍या जळगावातील महिलेसह एका वकीलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दोघा संशयीतांना अटक
जळगाव शहरातील एका भागात 55 वर्षीय व्यावसायीक हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यावसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या ओळखीचे वकील उखा राठोड (30, रा.रामदेव वाडी) यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणार्‍या एका महिलेची ओळख निर्माण झाली. त्यानंतर व्यावसायिकाने महिलेच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याच्या मोबदल्यात महिलेला वेळोवेळी पैसेही देण्यात आले. दरम्यान महिलेने दरवेळी व्यावसायिकाला काहीना काही कारणासाठी फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानुसार व्यावसायिकाने आतापर्यंत 71 हजार 500 आणि महिलेची ओळख करून देणारा वकील उखा राठोड याला 15 हजार रुपपये दिलेले आहे. त्यानंतर महिलेने पुन्हा फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तिला समजविण्याचा प्रयत्न केला परंतू ती समजण्याच्या मानसिकेतेत नव्हती.

पाच लाख न दिल्यास गुन्हा दाखलची धमकी
महिलेची पैशांची अपेक्षा वाढत गेल्यानंतर तिने चक्क पाच लाख रुपये मागितले. व्यावसायीक यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर महिलेने तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तसेच माझ्या अल्पवयीन मुलीवर देखील बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल व अडकवेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर व्यावसायिक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 सप्टेंबर रोजी तक्रार दिली.

महिलेसह वकिलाला अटक
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शनिवार, 7 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापळा रचून महिलेला एक लाखांची रोकड आणि चार लाख रुपयांचा चेक घेताना वकील राठोडसह अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेसह वकील राठोडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.


कॉपी करू नका.