भुसावळातील तीन लाखांचे बनावट नोटा प्रकरण : परप्रांतीय दोघे पोेलिसांच्या रडारवर

0

3 lakh fake notes case in Bhusawal : Two foreigners on police radar भुसावळ (8 सप्टेंबर 2024) : शहरातील नाहाटा चौफुलीजवळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवार, 4 सप्टेंबर रोजी तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणात तीन संशयीतांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन संशयीतांची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचे दोन पथक मध्यप्रदेशासह अन्य ठिकाणी रवाना झाले आहे. नोटा प्रकरणाचे कनेक्शन हे मध्यप्रदेशाशी जोडले गेले आहे.

मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर होणार अनेक खुलासे
पोलिसांना बनावट नोटांचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाहाटा महाविद्यालयाजवळ सापळा रचला. रावेर येथील संशयीत अब्दुल हमीद कागल हा जळगावच्या संशयीतांकडे बनावट नोटा घेण्यासाठी आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाली असून त्यांच्या सोबत आणखी दोघे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांची दोन पथके मध्यप्रदेशासह अन्य ठिकाणी रवाना झाली असून हे संशयीत सापडल्यानंतर बनावट नोटांच्या पुरवठादाराचा उलगडा होणार आहे.

तीन्ही संशयीत कोठडीत
संशयीत सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (38, रा.उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीम खान (35, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हमीद कागल (57, रा.रसलपूर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) हे तिन्ही पोलीस कोठडीत आहे. पोलिसांची दोन पथके संशयीताचा तपास करीत आहे, असे बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले.


कॉपी करू नका.