जळगाव जिल्ह्यात सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार !

0

मुक्ताईनगर (8 सप्टेंबर 2024) : भारतीय कापूस महामंडळ अंतर्गत जामनेरसह भुसावळ, चोपडा व बोदवड, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगांव व पाचोरा या ठिकाणी 11 कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता.

11 केंद्र सुरू करण्याची मागणी
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा अंतर्गत 11 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. या अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत चार केंद्रासह पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगांव व पाचोरा येथे मिळून एकूण 11 केंद्र लवकरच सुरू होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे कापूस हंगाम, उत्पादनाची माहिती घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्याबाहेरील छत्रपती संभाजीनगरात जावून कापूस विक्री करावा लागत होता मात्र आता जिल्ह्यात 11 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी होणार आहे.


कॉपी करू नका.