चोरीच्या सहा दुचाकींसह अट्टल दुचाकी चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Attal two-wheeler thief with six stolen bikes in the net of crime branch जळगाव (9 सप्टेंबर 2024) : अट्टल दुचाकी चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून धुळ्यातील मोहाडी व जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतून लांबवलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दीपक सुमार्‍या बारेला (कर्जाणा, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील कर्जाणा येथील संशयित आरोपी दीपक सुमार्‍या बारेला याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संदीप पाटील व प्रवीण मांडोळे यांना कळाल्यानंतर त्यांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवले. संशयीत रविवार, 8 रोजी घरी आल्यानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातील युनिकॉर्नबाबत विचारणा केली असता त्याने पाचोरा हद्दीतून ती चोरी केल्याची कबुली दिली तसेच अन्य पाच चोरीच्या दुचाकी काढून दिल्या.

चोरीच्या सहा दुचाकी जप्त
आरोपीच्या ताब्यातून पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लांबवलेल्या दोन तसेच पारोळा, मोहाडी, जि.धुळे तसेच धरणगाव व राजपूर, जि.बडवाणी हद्दीतून दोन दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. सहा दुचाकी जप्त केल्यानंतर आरोपीला पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार संदीपप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !